शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम शुल्क पुन्हा सुरू

By admin | Updated: January 4, 2017 00:19 IST

नोटाबंदीचा परिणाम अजूनही कायम असताना देशभरातील बँक ग्राहकांनी एटीएम वापर शुल्काची आकारणी पुन्हा सुरू केली आहे. हे शुल्क हटविण्याची मागणी होत आहे.

चेन्नई : नोटाबंदीचा परिणाम अजूनही कायम असताना देशभरातील बँक ग्राहकांनी एटीएम वापर शुल्काची आकारणी पुन्हा सुरू केली आहे. हे शुल्क हटविण्याची मागणी होत आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेने या मुद्यावर मौन धारण केले आहे. एनसीआर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवरोज दस्तूर यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरनंतरही एटीएम वापर शुल्क सुरू ठेवण्याची अपेक्षा होती. रिझर्व्ह बँकेकडून नव्या सूचना न आल्यामुळे बँकांनी शुल्क आकारणी सुरू केली आहे. एफएसएसचे अध्यक्ष व्ही. बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, डेबिट कार्डाचे सुरुवातीचे पाच व्यवहार मोफत नि:शुल्क आहेत. त्यानंतर बँका आपल्या नियमानुसार शुल्क आकारणी करतात. त्यासंबंधी बँकांनी आपल्या ग्राहकांशी वैयक्तिक करार केलेला आहे. नोटाबंदीच्या आधी अनेक बँका प्रीमियम ग्राहकांना शुल्क लावत नव्हत्या.नोटाबंदीच्या काळात ३१ डिसेंबरपर्यंत डेबिट आणि क्रेडिट कार्डांवरील सर्व शुल्क रिझर्व्ह बँकेने माफ केले होते. तथापि, या माफीचा लाभ अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविला नाही. ज्वेलर्स, कापड दुकानदार आणि अन्य अनेक व्यावसायिकांनी आपल्याकडून शुल्क वसूल केल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. नव्या वर्षांची डिजीटल व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट रेटवर (एमडीआर) मर्यादा घालण्यात आली आहे. हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 0.५ टक्के, २ हजारांवर 0.२५ टक्के एमडीआर आहे. तथापि, ही सूट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे बंधन कंपन्यांवर नाही, असा दावा कंपन्यांकडून करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)- नोटाबंदीच्या आधी स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँक प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये शुल्क आकारित होत्या. अन्य बँका २0 रुपये शुल्क घेत होत्या. - सुब्रमण्यम यांनी सांगितले की, रोख रक्कम मुक्तपणे उपलब्ध नाही. केवळ २0 टक्के एटीएम कार्यरत आहेत. त्यामुळे अन्य बँकांचे एटीएम वापरण्यासाठी सरकारने सबसिडी द्यायला हवे.- रतन वाटल यांनी तशी शिफारसही केलेली आहे. डिजिटल व्यवहारांची सक्ती केली जाणार , तर त्याचा संपूर्ण खर्च ग्राहकांच्या माथी मारणे गैर आहे.