शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आठवले, भामरे केंद्रात!

By admin | Updated: July 5, 2016 07:07 IST

केंद्रातील मोदी सरकारचा मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

केंद्रातील मोदी सरकारचा आज मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले आणि भाजपाचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची नावे पुढे असून, खा. विनय सहस्रबुद्धे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. विस्तारात १२ जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल आणि काहींना बाजूला केले जाईल, असे कळते. मोदी, अर्थमंत्री जेटली आणि अमित शाह यांच्या बैठकीत मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्र्यांचा शपथविधी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रेसिडेन्शिअल पॅलेसमध्ये होणार आहे. जेटली यांच्याकडे असलेले माहिती आणि प्रसारण खाते नव्या मंत्र्यांकडे जाईल, असे कळते. मात्र त्यांच्याकडे कायदा खात्याची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोव्याचे श्रीपाद नाईक यांना पुन्हा राज्यात पाठवले जाणार असल्याचे बोलले जाते. पक्ष विलीनीकरणास आठवलेंचा नकारउत्तर प्रदेशातील अनुप्रिया पटेल या अपना दलाच्या असून, त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच पद्धतीने रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाही भाजपामध्ये विलीन करावा, असे भाजपा नेत्यांनी त्यांना सूचित केले आहे.मात्र आठवलेंनी मंत्रिपदासाठी पक्षावर तुळशीपत्र ठेवण्यास नकार दिला आहे. त्यांना राज्यमंत्री दिले जाऊ शकते. कुणाला प्रमोशन, कुणाला डच्चूफेरबदलामध्ये ज्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान आणि मुख्तार अब्बास नकवी, जयंत सिन्हा यांची नावे आहेत. त्याचबरोबर कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल, अशी चर्चा आहे. मनसुख बसावा, आर. एस. कथेरिया, एम.के. कुंडारिया, निहालचंद, संवरलाल जाट, विजय सांपला यांनाही डच्चू मिळेल, असे दिसत आहे. सदानंद गौडा यांना मंत्रिपदी ठेवताना त्यांच्याकडील कायदा खाते मात्र काढले जाईल, असे कळते. सहस्रबुद्धेंचे काय?सोमवारी अमित शाह यांना अनेक खासदार भेटले. त्यात आठवले, डॉ. भामरे यांच्याबरोबर खा. एस. एस. अहलुवालिया, राजस्थानचे पी. पी. चौधरी, उत्तर प्रदेशातील अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, महेंद्र पांडे, विजय गोयल, एम. जे. अकबर, मध्य प्रदेशचे अनिल दवे, गुजरातचे मनसुखभाई मांडाविया, पुरुषोत्तम रुपाला, फग्गनसिंग कुलस्ते, कृष्ण राज, जसवंतसिंग भाबोरे, अर्जुन मेघवाल आणि अजय टमटा यांचा समावेश होता. दरम्यान, विनय सहस्रबुद्धे यांचा निश्चित समावेश होईल, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.19 नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता असून, सहा जणांना डच्चू मिळू शकतो. मात्र, यात कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले.