शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खगोलशास्त्र ऑलिम्पियाड; भारताला ४ सुवर्ण, एक रौप्य; जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 07:48 IST

कठीण चाचण्यांमधून एकूण ५४ पैकी पाच विद्यार्थ्यांची भारतामधून या स्पर्धेसाठी निवड झाली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई १८ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या तरुण खगोलशास्त्रज्ञांनी अभूतपूर्व यश मिळवले. आरुष मिश्रा, अक्षत श्रीवास्तव, बानीपब्रत माझी आणि पाणिनी यांनी सुवर्णपदक पटकावले, तर सुमंत गुप्ताला रौप्यपदक मिळाले. ६४ देशांतील ३२० तरुण शास्त्रज्ञ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम निकाल गुरुवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक सभागृहात जाहीर झाला.

या कार्यक्रमाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. दीपांकर बनर्जी आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव, तसेच होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरू डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिज्ञासा, सौहार्द आणि जागतिक प्रगतीच्या भावनेतून विज्ञानाच्या नव्या क्षितिजांचा सातत्याने शोध घ्या, असे आवाहन डॉ. काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. बनर्जी यांनी भारतातील अवकाश विज्ञान नव्या टप्प्यात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.गट स्पर्धेत 'शनी गटा' या संघाला विशेष विजेतेपद मिळाले. यात बांगलादेशचा फर्हान साजिद, बोलिव्हियाचा अडेमीर जयमेस रिवेरा, ब्राझीलचा लुका पिर्मता, बल्गेरियाचा स्वेतोस्लाव अराबोव, फ्रान्सची चार्लेन इलोय आणि जॉर्जियाची मरियम बेकौरी यांचा समावेश होता.

ही स्पर्धा नाही, तर हा विज्ञानाचा उत्सव

ही स्पर्धा नाही, हा विज्ञानाचा उत्सव आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, मानवी बुद्धितमत्तेची, बुद्धीची करामत व उत्सुकता समजून घेऊन मानवी जीवन सुखी होण्यासाठी वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी अजून सूर्यमाला, कृष्णविवर याबाबत सखोल शोधकार्य करावे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड शैक्षणिक समिती अध्यक्ष प्रा. अन्वेष मुजुमदार यांनी व्यक्त केली.

यांचा झाला गौरव

होमी भाभा केंद्र आणि अणुऊर्जा विभागाच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली असून, जगभरातील तरुण खगोलशास्त्रज्ञ येथे एकत्र आले, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडच्या जनरल सेक्रेटरी प्रा. नताशा दर्गोवीच यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड गट स्पर्धेतील विशेष विजेता म्हणून 'शनी गटा'चे फर्हान साजिद (बांगलादेश) अडेमीर जयमेस रिवेरा (बोलिव्हिया), लुका पिमेंता (ब्राझील), स्वेतोस्लाव अराबोव (बल्गेरिया), चार्लेन इलोय (फ्रान्स), मरियम बेकौरी (जॉर्जिया) यांना गौरविले गेले.

कठीण चाचण्यांमधून एकूण ५४ पैकी पाच विद्यार्थ्यांची भारतामधून या स्पर्धेसाठी निवड झाली. २१ ऑगस्ट रोजी एकूण १४५ पदके प्रदान केली यामध्ये ५० सुवर्ण, ४४ रौप्य, ५१ कांस्य पदकांसह २६ विशेष उल्लेखपत्रांचा समावेश होता. या ऑलिंपियाडचे आयोजन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी संयुक्तपणे केले.

टॅग्स :scienceविज्ञान