शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विधानसभा हिंसाचाराचे पडसाद

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

डाव्यांच्या बंदने केरळात जनजीवन ठप्प

डाव्यांच्या बंदने केरळात जनजीवन ठप्प
तिरुवअनंतपुरम : केरळ विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी झालेल्या हिंसक गदारोळाच्या निषेधार्थ राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते. बंददरम्यान काही भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुवअनंतपुरम आणि कोल्लममध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर बस वाहतूक बंद करण्यात आली. या दगडफेकीत एका बसचालकाच्या डोळ्याला जखम झाली. राजधानीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पोलीस संरक्षणात रुग्णालयात पोहोचविण्यात आले. कोझीकोड येथून प्राप्त वृत्तानुसार चेवयूरमध्ये एक ट्रक आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टूरिस्ट बसवरही दगडफेक करण्यात आली.
विरोधी आघाडीने स्वत:च्या आणखी एका अपयशावर पडदा घालण्यासाठीच संपाचे शस्त्र वापरल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी केला आहे. तर माकपचे प्रदेश सरचिटणीस कोडियारी बालाकृष्णन यांनी संप यशस्वी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध करणाऱ्या विरोधकांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला होता.
यूडीएफ आणि एलडीएफमध्ये आरोप प्रत्यारोप
दरम्यान केरळ विधानसभेत अभूतपूर्व गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) आणि माकपच्या नेतृत्वातील एलडीएफने सभागृहातील हिंसक धुडगुसासाठी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करून कारवाईची मागणी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बहुतांश आमदारांनी एलडीएफ सदस्यांवर कारवाईची मागणी उचलून धरली. प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांचे आसन फेकणाऱ्या आमदारांकडे त्यांचा इशारा होता. कारवाईसंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
(वृत्तसंस्था)