नवी दिल्ली : रामपालसारख्या ‘स्वयंघोषित संताकडून’ श्रद्धेच्या नावावर चालविण्यात येणारे आश्रम ‘दहशतवादाची’ केंद्रे बनत आहेत़ अशा आश्रमांवर बंदी आणली जायला हवी, असे परखड मत भाजपाने नोंदविले आहे़भाजपाचे मुखपत्र असलेल्या ‘कमल संदेश’च्या ताज्या अंकातील अग्रलेखात या विषयावर भाष्य केले आहे़ रामपालसारखे लोक एका दिवसात जन्मत नाही़ असे लोक हळूहळू समाजात अंधश्रद्धेचे नेटवर्क तयार करतात़ श्रद्धेच्या नावावर दहशतवादाचे केंद्र ठरलेल्या या लोकांनी उभारलेल्या आश्रमांची कसून चौकशी व्हायला हवी़ ते बंद करायला हवेत, असे यात म्हटले आहे़रामपालशिवाय अन्य कुठल्याही ‘स्वयंघोषित’ बाबाचे थेट नाव घेता येणार नाही; पण या बाबांवर कठोर टीका होणे गरजेचे आहे़ कारण श्रद्धेच्या नावावर अशा स्वयंभू बाबांनी आपली दुकाने उघडली आहेत व भाजपासोबत अशा काही ‘स्वयंघोषित बाबां’ची कथित जवळीक असल्याची टीकाही होत आहे, असे भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रभात झा संपादित या नियतकालिकात म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘स्वयंघोषित संतांचे’ आश्रम म्हणजे दहशतवादी केंद्रे!
By admin | Updated: December 8, 2014 15:01 IST