नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध निवडणूक खर्च आणि पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोग सुनावणीचा प्रारंभ उद्या सोमवारपासून करण्याची शक्यता आहे. अशाच प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्याविरुद्धची सुनावणीही उद्या होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. आयोगाने गेल्या महिन्यात चव्हाण यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले होते. त्याआधारे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत व निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि एनएए सैदी यांचे पूर्ण पीठ यावर निर्णय देणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अशोक चव्हाण यांची आजपासून सुनावणी?
By admin | Updated: June 9, 2014 05:30 IST