शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

By admin | Updated: January 28, 2017 00:58 IST

काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांशी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्नान घालणारे राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांशी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्नान घालणारे राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले. ६८ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला. अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. मूळ अरुणाचल प्रदेशच्या असणाऱ्या हंगपन दादा यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत (१३ हजार फूट उंचीवर) लपून बसलेल्या तीन घुसखोरांचा मुकाबला करून त्यांचा एकट्याने खात्मा केला होता. तथापि, या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला. अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.दादा १९९७ मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटद्वारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली. त्यांना गेल्यावर्षीच उंच पर्वतराजीत तैनात करण्यात आले होते. शहीद हंगपन दादा यांच्या पत्नी चासेंग लोवांग दादा यावेळी म्हणाल्या की, मी आज खूप दु:खी आणि खूप आनंदीही आहे. त्यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. इतरांनीही त्यांच्याप्रमाणे लष्करात सहभागी झाले पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)