शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम बापूकडे २,३०० कोटींची अघोषित संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:43 IST

आसाराम बापूच्या धर्मादाय संस्थांकडे २,३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आढळून आल्याने प्राप्तिकर खात्याने या संस्थांना देण्यात येणाऱ्या करसवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : आसाराम बापूच्या धर्मादाय संस्थांकडे २,३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आढळून आल्याने प्राप्तिकर खात्याने या संस्थांना देण्यात येणाऱ्या करसवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे. आसाराम व त्याच्या अनुयायांनी स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड, किसान विकास पत्र आणि फिक्स डिपॉझिट योजनांत गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात मालमत्ता दडविली असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. आसाराम याच्या आश्रमांनी २००८-०९ पासून २,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडविल्याचे खात्याचे म्हणणे आहे. आसारामच्या कोलकात्यात सात कंपन्या असून, त्या त्याचे भक्त चालवितात. आसारामने कर्जपुरवठा व्यवसायही सुरू केला होता. १९९१-९२ पासून त्याने आतापर्यंत १,४०० हून अधिक लोकांना ३,८०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. एक ते दोन टक्के व्याजाने हे कर्ज देण्यात आले होते व त्यासाठी हमी म्हणून पोस्ट डेटेड चेक, शपथपत्र आणि जमिनीची कागदपत्रे घेतली होती. आलेल्या देणग्या दडविण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचे आढळून आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)