शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Karnataka Election 2018: पाहिलंत का? ओवेसींनी घातला भगवा फेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:32 IST

एरवी शेरवानी आणि डोक्यावरील टोपीत दिसणाऱ्या ओवेसींना भगव्या रंगाचा फेटा घातलेला पाहून अनेकांना धक्का बसला.

बेळगाव: राजकारणात कधी कोणते चमत्कार पाहायला मिळतील, याचा नेम नसतो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे जनतेला असेच शाब्दिक चमत्कार अनुभवायला मिळत आहेत. मात्र, मंगळवारी बेळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेतील एक चमत्कार पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया आपोआपच उंचावल्या. या सगळ्याला निमित्त ठरले ते एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी. एरवी ओवेसी हे त्यांच्या कडवट विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांच्या एकूणच राहणीमानावरही याचा प्रभाव आहे.त्यामुळेच एरवी शेरवानी आणि डोक्यावर गोल टोपी अशा वेषात दिसणाऱ्या ओवेसींना भगव्या रंगाचा फेटा घातलेला पाहून अनेकांना धक्का बसला.

 यंदाच्या निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने एकही उमेदवार उभा केलेला नाही. निधर्मी मतांमध्ये फूट पडू नये, म्हणून ओवेसींनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळेच ओवेसी सध्या जनता दलाचा (सेक्युलर) प्रचार करत फिरत आहेत. जनता दलाने कर्नाटकमधील मुस्लिमबहुल भागांमध्ये ओवेसी कार्ड वापरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या भागांमध्ये ओवेसी आपल्या नेहमीच्या तिखट शैलीत भाजपा व काँग्रेसवर आगपाखड करत फिरत आहेत. बेळगावमधील सभेतही याचा पूरेपूर प्रत्यय आला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व राहुल गांधी या दोघांनाही एक आव्हान दिले. राहुल गांधी म्हणतात की, मला संसदेत 15 मिनिटेदेखील बोलू दिले जात नाही. तर मोदी त्यांना हातात कागद न धरता सलग 15 मिनिटं बोलून दाखवा, असे आव्हान देतात. परंतु, मला काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून बोलू दिले जात नाही त्याचे काय, असा सवाल त्यांनी विचारला. एवढेच नव्हे तर मोदी व राहुल गांधी दोघांनीही मला केवळ पाच मिनिटे बोलून द्यावे. मग बघा काय होते, असे ओवेसी यांनी म्हटले.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी