नाशिक : दिगंबर जैन सैतवाळ मंडळतर्फे आर्यनंदी महाराज यांचा १०८वा जयंती उत्सव १५ मार्च रोजी नाशिक येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य श्रींचे संगीतमय पूजन व शिखरजी विधान संपन्न करण्यात आले.पूजा विधानाकरिता भुसावळचे पंडित प्रवीण मुळकूटकर यांना पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. गजकुमार शहा, इतिहासाचे अभ्यासक व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक प्रभाकरराव काळे होते. दर वर्षीप्रमाणे या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार छबिलदासजी व सौ. विमल आंबेकर यांना रमेश व सौ. नलिनी हनमंते यांच्या हस्ते देण्यात आला. मान्यवरांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतुल संगवे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. स्वाती माडिवाले व आभारप्रदर्शन नीलिमा अवथनकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता अरुण भागवतकर, विनोद माडिवाले, सतीश मुद्दलकर, नितीन ओझरकर, स्वाती माडिवाले, सुलभा काळे आदिंनी प्रयत्न केले. (फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)
आर्यनंदी महाराज जयंती उत्सव
By admin | Updated: March 21, 2015 00:24 IST