शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांच्या "त्या" नातेवाईकाचं सोमवारीच झालं निधन

By admin | Updated: May 9, 2017 11:16 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यापासून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आपवर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यापासून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आपवर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 2 कोटी रूपयांची लाच घेतली असा आरोप करून त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी सोमवारी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले. सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांचे साडू सुरेंद्र कुमार बंसल यांच्यासाठी 50 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला होता, असा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत मंगळवारी(दि.9) सकाळी 11.30 वाजता सीबीआयकडे यासंदर्भातील पुरावे आपण सोपवणार असून, त्याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले. मात्र, ज्या सुरेंद्र कुमार बंसल यांचं नाव कपिल मिश्रांनी घेतलं त्याचं सोमवारीच निधन झालं.
 

दिल्लीतील मेदांत रुग्णालयात ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्या अंत्यसंस्कारात स्वतः केजरीवालही पोहोचले होते. बंसल आपल्या कुटुंबासह दिल्लीच्या प्रितमपुरा येथे राहात होते. त्यांच्या निधनामुळे दुःखी असलेल्या केजरीवालांचं कुटुंब मिश्रांच्या आरोपांमुळे आणखी  दुखावलं. स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी ट्विट करून आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं तसंच हा मुर्ख माणूस ज्या व्यक्तीचं आज निधन झालं आहे त्याच्यावर आरोप करत असल्याचं म्हटलं.

 
यानंतर आपच्या अनेक नेत्यांनी मिश्रांवर निशाणा साधला.  कपिल मिश्रा इतक्या खालच्या पातळीवर उतरलेत की ज्या सुरेंद्र कुमार बंसल यांचं आज निधन झालं त्यांच्यावरच असे बिनबुडाचे आरोप लावत आहेत असं ट्विट नेते संजय सिंग यांनी केलं.  

पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर अडचणींचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाने रविवारी पुढचा अंक गाठला होता. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी थेट केजरीवालांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातून निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. कपिल मिश्रा यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे असा आरोप करत मिश्रांनी खळबळ उडवून दिली होती. केजरीवाल मंत्रिमंडळात काम करताना अनेक गैरप्रकार आढळून आले. याबाबत मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना निवेदन दिल्याचे मिश्रांनी म्हटले होते. केजरीवाल आता पूर्वीसारखे राहिले नसून मुख्यमंत्री पदाने त्यांना बदलले आहे असे मिश्रा यांनी म्हटले होते. आपने कपिल मिश्रांचे आरोप फेटाळून लावत मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिल मिश्रा यांनी रविवारीच भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले होते. सोमवारीदेखील मिश्रा यांनी आपवर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यावर मला धमक्यांचे मेसेजेस आणि कॉल येत आहेत. माझी पक्षातून हकालपट्टी करुन दाखवा असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी भाजप आणि नरेंद्र मोदींचा विरोधक असून मी भाजपची भाषा बोलत असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे मिश्रांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी सकाळी सीबीआयकडे तक्रार करणार असून सीबीआयसमोर प्रत्यक्ष साक्षीदारही हजर करु असे मिश्रांनी म्हटले होते.