शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

केजरीवालांची हुकूमशहा वृत्ती पक्ष संपवेल- भूषण

By admin | Updated: March 27, 2015 14:40 IST

अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून त्यांची ही वृत्ती पक्षासाठी नुकसानदायक ठरेल असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून त्यांची ही वृत्ती पक्षासाठी नुकसानदायक ठरेल असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. पक्षात आपलाच अंतिम शब्द मानला जावा अशी त्यांची इच्छा असते, मात्र त्यांच्या या एकाधिकाराशाहीमुळे पक्ष संपेल असा इशारा भूषण यांनी दिला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी केजरीवाल व पक्षातील काही लोकांवर कडाडून हल्ला चढवला. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला नाही, मात्र तो देण्याची आमच्याकडे सतत मागणी करण्यात येत होती असेही त्यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले.
'आम आदमी पक्ष हा आंदोलनातून उदयाला आलेला पक्ष असून पक्षाचा संघर्ष स्वराज्यासाठी आहे. मात्र गेल्या महिन्याभरात पक्षात अनेक गोष्टी बिघडल्या असून आपचे रुपांतर देशातील इतर राजकीय पक्षांमध्ये होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे', असे योगेंद्र यादव यांनी सांगितले. पक्षाने कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. पक्षातील काही सदस्य मुद्दाम उलटसुलट माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. पक्षाच्या वेबसाईटवरून संविधान काढण्यात आले. आणि आमच्यावरच संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला. सध्या पक्षाच्या कृत्यांमुळे जनतेचा पक्षावरील विश्वास कमी होत असल्याचेही यादव यांनी सांगितले. 
दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला आहे.  पक्षात सुरू असलेला कलह मिटण्याची चिन्हे दिसत नसून आजच्या पत्रकार परिषदेत यादव व भूषण यांनी केलेल्या आरोपांनंतर हा संघर्ष आणखी भडकण्याचीच शक्यता आहे.