शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांचं नाव कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे- ऋषी कपूर

By admin | Updated: January 4, 2017 17:28 IST

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांवर भडकले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सोशल मीडियावर स्वतःच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेचे पात्र ठरतात. अनेक जण सोशल मीडियावरून त्यांची टिंगलटवाळीही करत असतात. सोशल मीडियावर त्यांना देशाचा एकुलता एक प्रामाणिक माणूस म्हणत त्यांच्या उपरोधिक टीकाही केली जाते. आता ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांवर भडकले आहेत.मात्र, बुधवारी म्हणजे आज ज्यावेळी निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच अरविंद केजरीवालांनी नाराजी व्यक्त केली. तसेच गोवा आणि पंजाबच्या निवडणुकांची तारीख एक नसावी, असंही आप म्हणणं आहे.

दरम्यान आपच्या याच टीकेचं बोट पकडून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. त्यांनी केजरीवालांवर राग व्यक्त करतानाच नेहमीच तक्रारी का करता, असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. "तुमचं नाव मि. कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे. तुम्हाला केव्हाच आनंद होत नाही", असं म्हणत ऋषी कपूर यांनी अरविंद केजरीवालांवर टीका केली आहे.