शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल हे तर नक्षलवादी- सुब्रमण्यम स्वामी

By admin | Updated: May 19, 2015 14:56 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे नक्षलवादी असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे नक्षलवादी असल्याची घणाघाती  टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.  केजरीवाल यांनी कारण नसताना हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात रस नसून महत्वाच्या विषयांवरून जनतेचे लक्ष हटवून दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. 
'निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने आपण पूर्ण करू शकत नाही, याची केजरीवाल यांन जाणीव झाली आहे. मुळात ते एक नक्षलवादी आहेत, त्यांना सरकार चालवण्यात रस नाही ' असे ते म्हणाले. ' दिल्लीतील जनतेला वाय-फाय सारखी सामान्य सुविधा देण्याचे वचनही (त्यांना) पूर्ण करता आलेले नाही. ते फक्त या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत', अशी टीकाही स्वामी यांनी केली आहे. यापूर्वीही स्वामी यांनी अनेकवेळा केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
दरम्यान हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत पोचला असून  आज केजरीवाल आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत