सुधारित/ केजरीवाल यांची नेतेपदी निवड केजरीवाल राज्यपालांना भेटले; सरकारसाठी दावा
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला.
सुधारित/ केजरीवाल यांची नेतेपदी निवड केजरीवाल राज्यपालांना भेटले; सरकारसाठी दावा
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला. केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया हे होते. त्यांनी जंग यांच्यासोबत २५ मिनिटे चर्चा केली. नायब राज्यपाल नवे सरकार स्थापण्याची औपचारिकता पूर्ण करण्याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शिफारशीसह अहवाल पाठविणार असल्याचे राजभवनाने एका निवेदनात नमूद केले. तत्पूर्वी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.-------------------------------सभ्यपणा बाळगा- आमदारांना सल्ला कॉन्स्टट्यिूशन क्लब येथे बैठकीला संबोधित करताना केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपचा पराभव केल्याबद्दल सर्व पक्ष आमदारांचे अभिनंदन करतानाच त्यांना सभ्यपणा बाळगण्याचा सल्ला दिला. अरेरावीमुळेच काँग्रेस पक्ष आज शून्यात जमा झाला आहे. केंद्रातील भाजपलाही अरेरावी नडली आहे. त्यामुळे आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारे उद्धटपणा दिसू देऊ नका. तुम्हाला मिळालेल्या जनादेशाचा आदर करा, असेे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.