शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल, जंग संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: April 21, 2016 03:38 IST

आम आदमी पक्षाच्या सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांची पूर्वसंमती न घेता आपल्याकडे कारागृह महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांची पूर्वसंमती न घेता आपल्याकडे कारागृह महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे हे लक्षात आल्यावर जे. के. शर्मा या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या पदाचा स्वीकारलेला पदभार परत केल्याने दिल्लीत पुन्हा एकदा लोकनियुक्त सरकार विरुद्ध नायब राज्यपाल अशा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.अलोक वर्मा यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर २९ फेब्रुवारीपासून कारागृह महासंचालक हे पद रिक्त आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी त्यांना कारागृह महासंचालक या पदाचाही अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे पत्र दिले. त्यानुसार शर्मा यांनी तिहारमध्ये जाऊन त्या पदाचा कार्यभार स्वीकारला. परंतु काही तासांतच त्यांनी हा कार्यभर ज्याच्याकडून घेतला त्याच्याकडे परत केला.शर्मा यांनी सरकारला पाठविलेल्या पत्रात लिहिले की, आपण मला या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास सांगितले. परंतु यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (नायब राज्यपाल) पूर्व संमती नाही, असे समजते. परिणामी मी कार्यभार परत केला आहे. हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे पत्र शर्मा यांना दिल्ली सरकारच्या अतिरिक्त गृहसचिवांच्या स्वाक्षरीने दिले गेले होते. परंतु आपल्या संमतीविना केलेली ही पदभार नियुक्ती नायब राज्यपाल रद्द करू शकतात, याची कुणकुण लागल्यावर त्यांनी स्वीकारलेला कार्यभार परत केला, असे समजते.गेल्या जूनमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांची संमती न घेता अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश मीना यांची लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली तेव्हापासून अशा नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री व नायब राज्यपाल यांच्यात सुंदोपसुदी सुरु आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)