शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

"अरूंधती रॉय यांना केवळ जीपला बांधू नका तर गोळ्या घाला"

By admin | Updated: May 22, 2017 22:30 IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट करुन सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट करुन सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात केली आहे. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटचे नेहमी वादात राहणारा गायकअभिजित भट्टाचार्य याने समर्थन केलं आहे. केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्याने अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं आहे. हे ट्विट करून अभिजित भट्टाचार्य पुन्हा वादात सापडला आहे. त्याच्या या ट्विटनंतर ट्विटराइट्सकडून भट्टाचार्यला लक्ष्य करण्यात येत आहे. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे अभिजित भट्टाचार्य नेहमी चर्चेत असतो.

 

 

कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान-

काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधून फिरवले होते. लष्कराच्या या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले होते. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला त्या मेजर नितिन गोगोई यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेजर  नितिन गोगोई यांचा दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमन्डेशनने सन्मान करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी गोगोई यांचा सन्मान केला. गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देण्यात आले .

 
श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील बीरवाह भागामध्ये जमावाच्या दगडफेकीपासून स्वत:च्या बचावासाठी एका स्थानिक तरुणाला जीपला बांधण्यात आलं होतं. दगडफेक करणा-या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी मेजर  नितिन गोगोई  यांनी हा निर्णय घेतला होता. नाखुषीने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. अखेर इलेक्शन डयुटीवर असलेले जम्मू-काश्मीरमधील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना दगडफेक करणा-या जमावापासून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी युवकाला जीपला बांधले होते. त्यानंतर या प्रकरणात सैन्याच्या जवानांविरुद्ध पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 342 (चुकीच्या पद्धतीने एखाद्याला कारावासात ठेवणे), 149 (गुन्ह्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 367 (अपहरण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने त्या लष्करी अधिका-याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.    
 
त्यापुर्वी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती.