शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची आत्महत्या

By admin | Updated: August 10, 2016 04:21 IST

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे

इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे. संतप्त निदर्शकांनी उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांच्या बंगल्यात तोडफोड केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यासह मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या भागाची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी कालिखो यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून अरुणाचलमध्ये काँग्रेसचे सरकार बहाल केले होते.पुल यांनी येथील मुख्यमंत्री निवासस्थान अद्याप रिकामे केले नव्हते. तेथेच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली, असे पोलिसांनी सांगितले. पुल यांनी शयनगृहातील पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीला आढळून आले. सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्युसमयी ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन पत्नी आणि चार मुले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटले नव्हते. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. पुल यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अनेक समर्थकांनी मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या बंगल्याला घेराव घालून पुल यांच्या अनैसर्गिक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याविरुद्ध बंड करून पुल यांनी भाजपच्या मदतीने १९ फेब्रुवारी रोजी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर १३ जुलैपर्यंत ते मुख्यमंत्रिपदी पाहिले. लहानपणी आई आणि वडील वारल्यानंतर अनाथ असलेल्या सुतारकामापासून कारकीर्द सुरू केली. सरकारी अधिकाऱ्यांकडील सुतारकाम करताना, त्यांनी पुढे रात्रशाळेत शिक्षण घेतले. पुल पुढे सुरक्षारक्षक व त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री बनले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली.