शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा शानबाग यांची प्रकृती स्थिर

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून अरुणा शानबाग यांच्या खालावलेल्या प्रकृतीत शनिवार सकाळपासून सुधारणा होत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून अरुणा शानबाग यांच्या खालावलेल्या प्रकृतीत शनिवार सकाळपासून सुधारणा होत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी अरुणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निर्दशनास आले. यावेळी त्यांच्या काही चाचण्या केल्यावर त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. प्रकृतीत आणखी थोडी सुधारणा झाल्यावर व्हेंटिलेटर काढण्यात येणार आहे.
अतिदक्षता विभागात ४ ते ५ डॉक्टरांचे पथक आणि ३ ते ४ परिचारिका त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यकता भासल्यास इतर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाईल, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.
गेली ४२ वर्षे अरुणा या कोमात आहेत. एकाच ठिकाणी बेडवर असूनही त्यांना जखमा झालेल्या नाहीत. कारण, सर्व परिचारिका आणि डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. काहीवेळा त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत असतात. दोन वर्षांपूर्वीही त्यांना न्युमोनिया झाला होता. पण त्यावरही अरुणा यांनी मात केली होती. १९७३ साली त्यांच्यावर झालेल्या अत्याचारानंतर त्यांच्या मेंदूची नस तुटली होती. यामुळे त्या कोमात गेल्या. त्यावेळी अरूणा यांचे वय २५ होते. आता त्या ६७ वर्षांच्या आहेत.