शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अरुण जेटलींचा पाकला इशारा

By admin | Updated: May 1, 2017 21:11 IST

भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि नंतर त्यातून अंग काढून घ्यायचे, असा पाकिस्तानचा निर्लज्जपणा अजूनही सुरूच आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि नंतर त्यातून अंग काढून घ्यायचे, असा पाकिस्तानचा निर्लज्जपणा अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय शहीद जवानांच्या पार्थिवाची विटंबना करूनही पाकिस्तान असं काहीही केलं नसल्याचा दावा करत आहे. आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही, तसेच आम्ही भारतीय जवानांच्या पार्थिवाची विटंबनाही केली नाही, असा खुलासा पाकिस्तानी लष्करानं केला आहे. त्यासाठी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रकही जारी केलं आहे. त्यानंतर खळवलेल्या अरुण जेटलींनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, पाकिस्तानला याचा हिशेब चुक्ता करावा लागेल, असंही ठणकावलं आहे. हे कृत्य आमच्या शेजा-यांचं आहे. असे प्रकार तर युद्धातही होत नाहीत. शांतीच्या काळात असं कधीच घडत नाही. आम्ही पाकिस्तानच्या या अमानवीय आणि भ्याडपणाच्या कृत्याचा निषेध करतो. पूर्ण देशाला लष्करावर विश्वास आहे. भारतीय जवानांचं बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असंही त्यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे.गेल्या काही तासांपूर्वी शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यात दोन जवान आज शहीद झाले. या दरम्यानच शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. सोमवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.