शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'Art of Living' मध्ये 'Art of Stealing' चा धुमाकूळ

By admin | Updated: March 15, 2016 15:19 IST

श्री श्री रवीशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चोरांनी आपले कलागुण सादर करत 'आर्ट ऑफ स्टिलिंग'चं प्रात्यक्षिकचं देऊन टाकलं

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - श्री श्री रवीशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चोरांनी आपले कलागुण सादर करत 'आर्ट ऑफ स्टिलिंग'चं प्रात्यक्षिकच देऊन टाकलं. या जागतिक सांस्कृतिक महोत्सवात चोरीच्या एकूण 72 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये पैसे, मोबाईल, लॅपटॉप, पाकिट, ओळख कागदपत्रे चोरी झाल्याची तक्रार आहे. पोलिसांनी याप्रकरणी 30 पाकिटमार आणि चोरांना अटक केली आहे. यामध्ये 3 महिलांचादेखील समावेश आहे. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यमुनेच्या तीरावर आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात चोरांनी आपले हात चांगलेच धुवून घेतले आहेत. सनलाइट पोलीस कॉलनीत 72 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरांनी देवाची मुर्तीदेखील सोडलेली नाही. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉलवरुन गणपतीची मुर्तीदेखील चोरी झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.   
 
रशियाहून आपली कला सादर करण्यासाठी आलेल्या 29 वर्षीय तरुणीलादेखील याचा फटका बसला. तिच्या परफॉर्मन्सआधीच ग्रीन रुममधून तिची बॅग चोरीला गेली. त्या बॅगमध्ये तिचे सगळे कपडे आणि दागिने होते. त्यामुळे नाव पुकारूनदेखील परफॉर्मन्स करु न शकणा-या या तरुणीकडे रडण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.
 
अटक करण्यात आलेले सर्वजण उत्तरपुर्व दिल्लीमधील तसंच उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि हरियाणामधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून चोरी गेलेले सामान परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस उपायुक्त मनदीप सिंग रंधावा यांनी दिली आहे. 
श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या या जागतिक सांस्कृतिक महोत्सवावरुन अगोदरच गदारोळ झाला होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगला 5 कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र आर्ट ऑफ लिव्हिंगने तो भरण्यास नकार दिला होता.  शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंगने माघार घेत दंड भरण्याची तयारी दर्शवली होती.  राष्ट्रीय हरित लवादाने  शेवटच्या मोक्याला 25लाख भरण्याची अट घालत या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं होतं.