शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

मुलगी ‘विकत’ घेणाऱ्या आमदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 05:35 IST

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी एका महिलेला ५० लाख रुपये देऊन मुलीच्या सावत्र आईकडून विकत घेतले होते, असे तपासातून उघडकीस

पणजी : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी एका महिलेला ५० लाख रुपये देऊन मुलीच्या सावत्र आईकडून विकत घेतले होते, असे तपासातून उघडकीस आले आहे. बाबूश दुपारी ३ वाजता रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागाला शरण आले असून, पोलिसांनी पीडितेच्या आईला अटक केली आहे.बलात्कार प्रकरणात मोन्सेरात यांच्याबरोबरच मुलीची सावत्र आईही तितकीच जबाबदार असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले आहे. आपल्या सावत्र आईने एका महिलेच्या मदतीने ५० लाख रुपये घेऊन आपल्याला बाबूशला विकून टाकले, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. तिच्या या लेखी जबाबामुळे मोन्सेरात आणखी अडचणीत आले आहेत. कारण बलात्काराबरोबरच मानवी तस्करीअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या सवत आईलाही मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. मार्चमध्ये मोन्सेरात यांच्या ज्या फार्म हाउसवर ही घटना घडल्याचे पीडित मुलीने सांगितले त्या फार्म हाउसची पोलिसांनी कसून चौकशी केली. उत्तर गोव्याचे फॉरेन्सिक फिरती मोबाइल व्हॅनसह पथकही त्या ठिकाणी हजर होते. काही नमुनेही या पथकाने गोळा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)