शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव

By कुणाल गवाणकर | Updated: January 6, 2021 23:22 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंग पॅड्स सक्रिय; दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

श्रीनगर: हिवाळ्यात सीमेपलीकडून जवळपास ४०० दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्च पॅडवर असलेले दहशतवादी हिवाळ्यात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतात, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू असून अनेक भागांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे.हिवाळ्याच्या दिवसांत सीमेपलीकडे असलेले दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू करतात. यंदाच्या हिवाळ्यातही तब्बल ४०० दहशतवादी सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात आहेत. २०१८ मध्ये १४३, २०१९ मध्ये १४१, तर २०२० मध्ये ४४ दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. पाकिस्तानी सैनिक सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करतात. त्यावेळी भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर दिलं जात असताना दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाते. गेल्या वर्षात भारतीय जवानांनी सीमेपलीकडून होत असलेले घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं वर्षभरात ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. २००३ नंतर प्रथमच पाकिस्ताननं इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्चिंग पॅड्सवर ३०० ते ४१५ दहशतवादी आहेत. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना त्यांच्याकडून आखण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या इराद्यानं हा कट रचण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. पीर पंजालच्या (काश्मीर खोरं) उत्तरेला नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या लॉन्च पॅडवर १७५ ते २१०, तर पीर पंजालच्या (जम्मू क्षेत्र) दक्षिणेला असलेल्या नियंत्रण रेषेजवळील परिसरात ११९ ते २१६ दहशतवादी घुसखोरीची तयारी करत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवान