शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

अर्णब गोस्वामी पत्रकार आहे का ? - बरखा दत्त

By admin | Updated: July 28, 2016 11:48 IST

प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने पत्रकारांवर खटले भरण्याची त्यांना शिक्षा करण्याच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली. त्यावर बरखा दत्त चांगल्याच संतापल्या आहेत. 
 
हा अर्णब गोस्वामी पत्रकार आहे ? या चर्चेमुळे मला मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते अशा शब्दात बरखा यांनी अर्णबवर आगपाखड केली आहे. अर्णब डरपोक ढोंगी आहे अशी टीका बरखा यांनी केली आहे. 
 
अर्णब पाकिस्तान समर्थनाची विधाने करतो पण जम्मू-काश्मीरमधल्या भाजप-पीडीपी आघाडी सरकारबद्दल एक शब्दही का बोलत नाही ?, मोदींच्या पाकिस्तानबद्दलच्या भूमिकेबद्दलही अर्णब का गप्प आहे ? अर्णब गोस्वामी देशभक्तीच्या गोष्टी करतो मग तो केंद्र सरकारबद्दल गप्प का आहे ? चमचेगिरी ? असे प्रश्न बरखा दत्त यांनी विचारले आहेत. 
 
एक पत्रकार सरकारला काही प्रसारमाध्यमांची तोंड बंद करायला सुचवत आहे. ते आयएसआय एजंट, दहशतवादाचे सहानुभूतीदार असल्याचा समज निर्माण करुन दिशाभूल करत आहे. त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी करतो आणि आम्ही गप्प बसतो. 
 
पण मी घाबरणार नाही. गोस्वामी तुमच्या शो मध्ये  तुम्ही माझे नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कितीही वेळा घ्या मी घाबरणार नाही असे बरखा दत्त यांनी म्हटले आहे.