शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराकडून 13 उपग्रहांचा वापर

By admin | Updated: June 26, 2017 12:15 IST

कार्टोसॅट-2 इ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता 13 झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - कार्टोसॅट-2 ई उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता 13 झाली आहे. इस्त्रोमधील सूत्रांनी ही माहिती दिली.  टेहळणी आणि सीमा भागातील नकाशे रेखांकन करण्याबरोबरच शत्रूच्या जमीन आणि समुद्रातील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे. 
लष्करी उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणारे हे बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत स्थिर करण्यात आले आहेत. शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेला कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रह 712 किलो वजनाचा आहे. गरजेनुसार विशिष्ट अशा भागांचे उच्च दर्जांचे फोटो पाठवण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रह खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत आहेत. 
 
आणखी वाचा 
ISRO समोर असते अवकाश कच-यापासून उपग्रह वाचवण्याचे आव्हान
 
भारतीय नौदलही विविध भागात तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुडया, लढाऊ विमाने यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी जीसॅट-7 उपग्रहाचा वापर करते. भारताकडे आज उपग्रह विरोधी अस्त्र डागण्याची क्षमता आहे ज्यामध्ये शत्रूचा उपग्रह नष्ट करता येतो. आजच्या घडीला अशी क्षमता फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. शक्य असले तरी इस्त्रोला आज अशा उपग्रह विरोधी तंत्रज्ञानामध्ये पडण्याची अजिबात इच्छा नाहीय. इस्त्रो आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते असे स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले. 
 
एकाचवेळी 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 
इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ या अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी ९.२९ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर २७ मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - २ मालिकेतील उपग्रहासह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. ३१ उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि २९ परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट - २ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, अन्य ३० उपग्रहांचे मिळून २४३ किलो वजन आहे.