शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीचा पैसा लष्कराला नको!

By admin | Updated: October 24, 2016 05:36 IST

‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत, ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अट निर्मात्यांनी मान्य केली असली

नवी दिल्ली/ पणजी : ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत, ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अट निर्मात्यांनी मान्य केली असली, तरी असा बळजबरीचा निधी घेण्यास लष्कराने साफ नकार दिला आहे. दुसरीकडे, अशा खंडणी म्हणून वसूल केलेल्या पैशातून लष्कराला मदतीची गरज नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला. ते रविवारी गोव्यात पत्रकारांशी बोलत होते.पाक कलावंतांची भूमिका असल्याच्या कारणावरून मनसेने ‘ए दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मध्यस्थी केल्यानंतर मनसेने तलवार म्यान केली. यापुढे पाक कलाकारांना चित्रपटात काम न देता, सैनिक कल्याण निधीमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये द्यावेत, ही राज यांची अट निर्मात्यांनी मान्य केली. मात्र, अशा प्रकारे धमकावून उकळलेले पैसे स्वीकारण्यास सैन्याने नकार दिल्याचे कळते. लष्कराला राजकारणामध्ये ओढू नका. लष्कर धर्मनिरपेक्ष आहे. बळजबरीने नव्हे, तर स्वेच्छेने दिलेला निधीच स्वीकारतो, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना माजी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस. जयस्वाल म्हणाले, ‘आर्मी भीक दिलेला पैसा घेत नाही. जर निर्मात्यांना दान देण्याची इच्छा असेल, तर त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे स्वेच्छेने द्यावे.’