देवळाली कॅम्प : आर्मी रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या मंुबई कार्यालयामार्फत होणार्या भरती प्रक्रियेला देवळालीत मंगळवारपासून (दि.६) सुरुवात होणार आहे. मुंबईसह विविध ठिकाणी आवश्यक पदांसाठी ही भरतीप्रक्रि या राबविण्यात येत आहे. नाका नं. ४ जवळील लष्कराच्या मैदानावर ही भरतीप्रक्रिया पार पडणार असून, या भरतीत सहभागी होण्यासाठी सोमवारपासूनच अनेक युवक देवळालीत दाखल झाले आहेत. आर्मी रिक्रूटमेंट बोर्डाच्या मंुबई कार्यालयातर्फे राबविण्यात येणार्या या भरती प्रक्रि येत मुंबईतील जागांसाठी मंगळवारी (दि.६), मुंबई उपनगरसाठी बुधवारी (दि.७), तर दि. ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत नाशिक जिल्ातील विविध पदांकरिता भरतीप्रक्रि या राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी ज्या युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून ॲडमिट कार्ड मिळवले आहे, अशा उमेदवारांनाच भरती प्रक्रि येमध्ये समाविष्ट होता येणार असल्याची माहिती भरतीप्रक्रिया अधिकार्यांनी दिली आहे. (वार्ताहर)
देवळालीत आजपासून लष्कर भरतीप्रक्रिया
By admin | Updated: September 5, 2016 23:18 IST