शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला हवेत 6 महिने

By admin | Updated: October 4, 2016 11:05 IST

सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4-पाकिस्तानकडून वारंवार होणा-या दहशतवादी कारवायांना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर प्रभावी उपाययोजना आखण्याचा विचार करत आहे. सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास  पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे. एक-दोनदा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर दहशतवाद्यांचे काहीही नुकसान होणार नाही, त्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे असतील तर त्यासाठी मीडियम टर्म प्लान अंमलात आणणे गरजेचे आहे, असे लष्करातील वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले आहे. 
 
तसेच,काश्मीरमधील तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि अन्य परिसरात हल्ले होणाच्या संशयावरुन सरकारने सतर्क राहण्याची गरज आहे, असे देखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे. यावेळी रविवारी बारामुल्ला इथे बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लागोपाठ कारवाया कराव्या लागतील, असे लष्कराचे म्हणणे आहे. 
आणखी वाचा
लष्करातील वरिष्ठ अधिका-यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील दहशतवादी बॅकफुटवर आले आहेत, मात्र  गाफील न राहता त्यांना गंभीर स्वरुपात हादरा द्यावा लागेल. भारताने  केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आणखी तळ निर्माण होऊ शकतात, ती आधीच उद्ध्वस्त करुन, नियंत्रण रेषेपलिकडे हल्ला करण्यासाठी काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवावी लागणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
 
भारतीय लष्कर आणि गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार,  पाकव्याप काश्मीरमध्ये 40 पेक्षा जास्त दहशतादी प्रशिक्षण शिबिरे आहेत. ही सर्व शिबिरे दुर्गम ठिकाणी असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण रेषेजवळ 50 लॉन्च पॅड आहेत, ज्यात 200 हून अधिक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. ज्यांना पाकिस्तानी सैन्य आश्रय देत आहे.