ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. १ - बरेली येथे कॅनॉटमेंट परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात वैमानिकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेली कॅनॉटमेंट परिसरातील तळावर उतरत असताना हा अपघात झाला. या अपघातात वैमानिक, सहवैमानिकासह आणखी एका कर्मचा-याचा मृत्यू झाला. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.