शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही रिकामटेकडे आहोत का?

By admin | Updated: April 8, 2016 02:55 IST

दुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रोजगार याबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीदुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रोजगार याबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल) सर्वोच्च न्यायालयात  १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. यामुळे न्यायाधीशांनी त्यांना रागातच विचारले की ‘आम्ही रिकामटेकडे आहोत का? कमीत-कमी या बाबतीत तरी काही गंभीरता दाखवा.’ दुष्काळग्रस्त भागांबाबत चुकीची आकडेवारी दाखल केल्याबद्दलही न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. एन. व्ही. रमण यांच्या पीठाने गुजरात व हरियाणा या दोन राज्यांना खडसावले. केंद्र सरकारतर्फे न्यायालयात ज्यावेळी वरील मुद्द्यावर शपथपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागण्यात आला, त्यावेळी न्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘असे वाटते, ही तुमची प्राथमिकता नाही. आम्हाला काही काम नाही का? इथे दोन न्यायाधीश बसलेले आहेत. तुमची आमच्याकडून हीच अपेक्षा आहे का की, आम्ही काहीच करू नये? वेळ घालवण्यासाठी आम्ही घड्याळ बघत बसावे का?’ ज्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद न्यायालयात पोहोचल्या, त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना खडसावून सांगितले, ‘१५ मिनिटे काही बोलू नका आणि चालते व्हा. आमचा वेळसुद्धा मौल्यवान आहे.’ आम आदमी पार्टीचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या स्वराज अभियान या बिगर सरकारी संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे. दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये केंद्र आणि त्या-त्या राज्य सरकारांनी काय उपाययोेजना केलेल्या आहेत, अशी विचारणा या याचिकेत सरकारला करण्यात आलेली आहे.