शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी वृद्धांना करतात वाघाच्या हवाली?

By admin | Updated: July 4, 2017 14:04 IST

सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी घरातील वृद्ध व्यक्तीला वाघाच्या हवाली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पिलिभीतमध्ये घडत असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

पिलिभीत, दि. 4- सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी घरातील वृद्ध व्यक्तीला वाघाच्या हवाली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पिलिभीतमध्ये घडत असल्याचं समोर आलं आहे. वाघाच्या हल्ल्यात घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सरकारकडून लाखो रुपये नुकसान भरपाई मिळत असल्याने हा प्रकार गावातील लोक करत असतील, असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
 
फेब्रुवारी २०१६ पासून फक्त माला या जंगलात वृद्ध व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. वाइल्ड क्राईम कंट्रोल ब्युरोच्या केंद्रीय सरकारी एजन्सीचे कलीम अतहर यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी वृद्धांना वाघाच्या हवाली केलं जातं,  याबाबतचा संशय व्यक्त केला आहे. वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला तर सरकार त्या घरातील व्यक्तींना लाखो रुपये नुकसान भरपाईच्या नावाखाली देत आहे. याचा गैरफायदा काही लोकांकडून घेण्यात येत असल्याचा संशय अधिकाऱ्याने व्यक्त केला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या लोकांच्या परिसरात जावून कलीम अतहर यांनी चौकशी केली होती. तेथे असलेल्या पीडित व्यक्तीची भेट घेवून नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना हा संशय आला असून त्यांनी तसं अहवालात नमूद केलं आहे.
 
स्थानिकांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुटुंबातील वृद्ध व्यक्ती साथ देतात. वृद्धापकाळामुळे ते जंगलातून कुटुंबियांसाठी काही आणू शकत नाही त्यामुळेच वाघाच्या हवाली जावून घरची गरिबी दूर करण्याचा एक मार्ग म्हणून ते याकडे बघतात. असं तेथील जर्नेल सिंग या साठ वर्षीय शेतकऱ्याने सांगितलं आहे.
 
१ जुलै रोजी ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व्ही. के. सिंह यांनी या प्रकरणाचा तपास केला पण त्यांना तपासातून खऱ्या गोष्टी समोर आल्या, असं वाटलं नाही. या प्रकरणात महिलेचा मृतदेह जंगलापासून १.५ किलोमीटर दूर होता त्यामुळे सिंह यांनी त्या महिलेच्या घरातील व्यक्तीचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला होता