१३ संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज १८ रोजी युक्तिवाद : कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील अपहार प्रकरण
By admin | Updated: May 17, 2016 00:45 IST
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे.
१३ संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज १८ रोजी युक्तिवाद : कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील अपहार प्रकरण
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे.बनावट इतिवृत्त तयार करून कानळदा ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेत २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या १३ संचालकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात १२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी संचालकांनी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके तर आरोपींतर्फे ॲड.सचिन पाटील कामकाज पाहत आहेत.