शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ए.आर. रहमान यांच्याविरुद्ध फतवा

By admin | Updated: September 13, 2015 01:58 IST

‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट इस्लाम आणि प्रेषित मोहंमद यांचा अपमान करणारा असल्याचा दावा करून रझा अकादमीने या चित्रपटाचे निर्माते मजीद माजिदी

नवी दिल्ली : ‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट इस्लाम आणि प्रेषित मोहंमद यांचा अपमान करणारा असल्याचा दावा करून रझा अकादमीने या चित्रपटाचे निर्माते मजीद माजिदी आणि सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढला आहे. बहुसंख्य शिया लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रकाशित झाला. मुंबईतील रझा अकादमी ही सुन्नी मुस्लिमांची संघटना आहे. इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांचे चित्र रेखाटणे अथवा त्यांची व्यक्तिरेखा साकारणे निषिद्ध मानले जात असताना ‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’मध्ये या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा दावा अकादमीने केला आहे. अकादमीचे प्रमुख सईद नूरी यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या नावासच मुळात आमचा आक्षेप आहे. लोकांना चित्रपट आवडला नाही तर ते या नावाचा वाईट पद्धतीने उल्लेख करतील. ज्याने इस्लामचा व प्रेषितांचा अपमान होईल.चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांचे चारित्र्य आक्षेपार्हही असू शकेल. प्रेक्षकांच्या मनात साहजिकच याची सांगड प्रेषितांशी घातली जाईल. हे मुस्लिमांना कदापि मान्य होणार नाही. अकादमीने याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ न देण्याची मागणीही केली आहे.माजिदी आणि रेहमान यांनी इस्लामविरोधी काम केले असल्याने त्यांच्याविरुद्ध हाजी अली मशिदीचे इमाम मुफ्ती मेहमूद अख्तर यांनी हा फतवा काढला आहे. या दोघांनी पुन्हा कलमा म्हणून आपले इमान बळकट करावे असे मौलानांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे लग्न झाले असल्यास त्यांना पुन्हा त्यांच्या पत्नीशी लग्न करावे लागेल, असे या फतव्यात नमूद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)