शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसल ब्लोअर कायद्यास मंजुरी

By admin | Updated: May 14, 2014 04:31 IST

भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या जागल्यांना मिळणार संरक्षण, नवा कायदा :व्हीसल ब्लोअरला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली : सरकारमधील भ्रष्टाचार किंवा लोकसेवकांनी घडवून आणलेले घोटाळे उघडकीस आणणार्‍यांना भयमुक्त केले जाणार असून कोणत्याही दबावापासून किंवा धोक्यापासून त्यांना संरक्षण देणार्‍या व्हीसल ब्लोअर विधेयकावर शुक्रवारी राष्ट्रपतींनी मंजुरीची मोहर उठवली आहे.व्हीसल ब्लोअर्स संरक्षण कायदा २०११ नुसार भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍यांची ओळख गुप्त राखण्यासह अशा व्यक्तींना संरक्षण देणारी यंत्रणा अस्तित्वात येईल. मंत्र्यांसह लोकसेवकांकडून होणारा सत्तेचा गैरवापर किंवा भ्रष्टाचाराची माहिती उघड करण्याला प्रोत्साहन देण्यात हा कायदा मोठी भूमिका बजावेल. संबंधित कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जनहितासाठी तूर्तास केंद्रीय दक्षता आयोग या सक्षम प्राधिकरणाकडे भ्रष्टाचाराचीे माहिती उघड करता येईल. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी घेण्याबाबत अन्य मंडळ नियुक्त करण्यासाठी सरकारला अधिसूचना जारी करता येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)-तर कारावास आणि दंडही....एकीकडे तक्रारकर्त्याला संरक्षण दिले जात असले तरी खोटी तक्रार किंवा माहिती पुरविल्यास कारावास आणि दंड ठोठावण्याची तरतूदही या कायद्यात आहे. हेतूपुरस्सर वाईट उद्देशाने चुकीची, खोटी किंवा दिशाभूल होणारी माहिती दिल्यास कारावासाची कमाल शिक्षा दोन वर्षांपर्यंत तर दंडाची रक्कम ३० हजारापर्यंत वाढविली जाऊ शकते, असे कायदा मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले. -वैयक्तिक प्रतिज्ञापत्र आवश्यक..मी पुरविलेली माहिती सत्य असल्याचा माझा विश्वास असून मी तक्रारीत केलेले आरोप ठोसपणे खरे आहेत, असे तक्रारकर्त्याला वैयक्तिक प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागेल. भ्रष्टाचाराबाबत दिली जाणारी प्रत्येक गोपनीय बाब ही चांगल्या भावनेतून असावी हा त्यामागचा उद्देश आहे.