शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सहयोगी स्टेट बँकांच्या विलीनीकरणास मंजुरी

By admin | Updated: June 16, 2016 04:08 IST

पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली.

नवी दिल्ली : पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली.या प्रकरणी काही कायदेशीर प्रकरणांवर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा मंत्रिमंडळासमोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, यासंदर्भात वित्त मंत्रालयातर्फे स्वतंत्र माहिती दिली जाणार आहे. स्टेट बँकेचे प्रबंध संचालक आणि समूह कार्यकारी व्ही.जी. कन्नन यांनी एका खासगी वाहिनीला सांगितले की, आमच्या बँकेने मांडलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली असून, मार्च २०१७ पर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. आता सहयोगी बँकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. ती दोन महिन्यांत पूर्ण होईल. या बँकांच्या विलीनीकरणाने कामकाजातील पुनरावृत्ती तसेच अन्य खर्चात घट होईल. एकाच ठिकाणी अनेक बँकांच्या शाखा राहत असल्याने निर्माण होणाऱ्या समस्याही दूर करता येतील. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांत स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ पतियाळा तसेच स्टेट बँक आॅफ म्हैसूर या बँकांचा समावेश आहे.या विलीनीकरणामुळे स्टेट बँकेचा एकूण व्यवसाय ६७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. शाखांची संख्याही २२,५00 होण्यासह एटीएमची संख्याही ६0 हजार होईल. स्टेट बँकेच्या सध्या १६,५00 शाखा आहेत. जगभरात ३६ देशांत १९९ कार्यालयेही आहेत. यापूर्वी २00८ साली स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र, तर २0१0 साली स्टेट बँक आॅफ इंदूरचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाले होते.सध्या जगातील सर्वांत मोठ्या ५0 बँकांत भारतातील एकाही बँकेचा समावेश नव्हता. पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणामुळे स्टेट बँकेचा समावेश अशा आघाडीच्या ५0 बँकांत निश्चित होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर स्टेट बँकेचा विस्तार होईल. याचा फायदा सहयोगी बँकांसह ग्राहकांनाही होईल. या विलीनीकरणाचे मी स्वागत करते.-अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, स्टेट बँक आॅफ इंडिया