शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

४४५ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी- लीड

By admin | Updated: January 7, 2016 21:37 IST

जिल्हा नियोजन समितीची बैठक आदिवासी योजनेसाठी ९१ कोटींची तरतूद

जिल्हा नियोजन समितीची बैठक आदिवासी योजनेसाठी ९१ कोटींची तरतूद
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ४४५ कोटींच्या विकास आराखड्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
मंजूर केलेले हे वार्षिक आर्थिक नियोजन या वर्षाच्या तुलनेत सुमारे ५.३ टक्केने अधिक आहे. चालू वर्षाकरिता मंजूर नियतव्यय २५२ कोटी ३३ लाख रुपये आहे. यात भरीव वाढ करून सुमारे ४४५ कोटींच्या या विकास आराखड्यास अल्पशा सुधारणा करून सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासासह कृषी आणि पायाभूत सुधारणांसाठी भरीव तरतूद केली आहे.
सुमारे ९५ टक्के निधी हा जिल्हास्तरीय योजनांसाठी आहे. यातील गाभाक्षेत्रासाठी सुमारे दोन तृतीयांश (२/३) व बिगर गाभाक्षेत्रासाठी एक तृतीयांश (१/३)तरतूद केली आहे. उर्वरित ५ टक्के निधीपैकी ४.५० टक्के रक्कम नावीन्यपूर्ण योजना व ०.५० टक्के रक्कम मूल्यमापन, संनियंत्रण व जिल्हा नियोजन समितीच्या बळकटीकरणासाठी आहे.
गाभा क्षेत्रातील कृषी व संलग्न सेवांसाठी ५७ कोटी ६९ लाखांची तरतूद आहे. ग्रामविकास २२ कोटी ४८ लाख ३६ हजारांची, पूरनियंत्रणासाठी १६ कोटी ६२ लाख २९ हजारांची तरतूद केली आहे. सामाजिक सेवांसाठी ७१ कोटी ४९ लाखांची भरीव तरतूद आहे. या सर्वांवर सुमारे १६८ कोटी ३० लाख खर्च करण्यात येणार आहे. याप्रमाणेच बिगर गाभाक्षेत्रासाठी ८४ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी ऊर्जेसाठी सहा कोटी, उद्योग व खाण ५३ कोटी ६६ लाख, परिवहन ५२ कोटी ६५ लाख, सामान्य आर्थिक सेवांसाठी १४ कोटी ५५ लाख ३४ हजार, सामान्य सेवा इतर कार्यक्र मांकरिता १० कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली अहे. (प्रतिनिधी)


जिल्हा नियोजन समिती बळकटीकरण व मूल्यमापन कार्यक्रम आणि नावीन्यपूर्ण योजनेसाठी १३ कोटी २९ लाख रु पये तरतूद आहे. आदिवासी (टीएसपी) योजनेसाठी ९१ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद आहे. तर, आदिवासी इतर (ओटीएसपी) योजनांसाठी २५ कोटी २१ लाखांची तरतूद आहे. यानुसार, सुमारे ११६.४४ कोटींच्या आराखड्यासह समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेसाठी (विशेष घटक) सुमारे ६२.८७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.
.......................