शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या कामांची मंजुरी मागणीनुसार नाहीच

By admin | Updated: July 10, 2015 00:23 IST

बॅकडेटेड कारभार : पक्षाच्या नावे निधी वाटप

बॅकडेटेड कारभार : पक्षाच्या नावे निधी वाटपनाशिक : जिल्हा परिषदेला रात्रीतून प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे ही एका ठरावीक पक्ष पदाधिकार्‍याच्या पत्रानुसार वाटप होत असल्याची धक्कादायक माहिती उघड होत असून, या प्रकरणाची पाळेमुळे थेट वरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे आदिवासी भागातील रस्त्यांची कामे ३०५४ या लेखाशीर्षखाली इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदि तालुक्यांमध्ये मागील दोेन-तीन वर्षांपासून काही ठरावीक मक्तेदारांमार्फत मंजूर करून आणत असल्याचे समजते. जिल्हा परिषदेला नुकताच ३० व ३१ मार्चच्या रात्री अचानक घबाड मिळाल्यागत १०० कोटींहून अधिकचा निधी रस्त्यांच्या कामांवर मंजूर झाला असून, ही निधी मंजुरीही एका पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या पत्रावर झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. तेथे संबंधित रस्त्यांच्या कामांची गरज अथवा मागणी न होताच आधी कामे मंजुरीनंतर मागणी अशा स्वरूपात ही कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होत असल्याचे कळते. स्थानिक आदिवासी वाड्या-पाड्यांना कोणत्या रस्त्यांची गरज आहे. याची माहिती न घेताच ही कामे मंजूर होत असल्याची तक्रार आहे. त्यातही मागील दाराने मागील तारखा टाकून (बॅकडेटेड) कामांना शिफारशी व कार्यारंभ आदेश देण्यात येत असल्याची तक्रार आमदार निर्मला गावित यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने ही कामे मंजूर करण्यासंदर्भातील रजिस्टरच ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. या मंजूर रस्त्यांचा आदिवासी भागातील वाडे-वस्तींना कितपत फायदा होईल, याबाबत साशंकताच आहे. आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी येत्या पावसाळी अधिवेशनात करण्याची तयारी आमदार निर्मला गावित यांनी केली आहे. काल (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या गोष्टीला एका अधिकार्‍याने दुजोरा दिला असून, ग्रामपंचायतींवर मंजूर होत असलेल्या कामांबाबत येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असे स्पष्टपणे सांगत यापुढे ग्रामपंचायती हद्दीबाहेरील १० व १५ लाखांची कामे करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे या बॅकडेटेड कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजुरीचा प्रकार थेट विधानसभेत पोहोचण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)