शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

By admin | Updated: June 9, 2015 04:29 IST

विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील. नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून ही पदे रिक्त होती. गुरुवारी राष्ट्रपती भवनात हे दोन्ही अधिकारी शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच अधिकृत सूचना जारी होईल.इंडियन बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी.एम. भसीन यांची दक्षता आयुक्त तर माजी सामाजिक न्याय आणि अधिकार सचिव सुधीर भार्गव यांची माहिती आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांना मंजुरी दिली होती. चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेली नियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे. आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे. १९६४ मध्ये सीव्हीसी ही भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महसूल विभागातील एखाद्या अधिकाऱ्याकडे हे पद सोपविण्यात आले आहे. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, प्रशांत भूषण आणि इतरांनी चौधरींच्या नियुक्तीला विरोध केला होता; मात्र सरकार निर्णयावर ठाम राहिले. चौधरी हे काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास चमूचे(एसआयटी)सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये ते सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. (प्रतिनिधी)————विजय शर्मा यांना अवघे सहा महिनेविजय शर्मा हे २०१२ पासून केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. ते यावर्षी १ डिसेंबर रोजी ६५ वर्षांचे होत असून, त्यांना मुख्य माहिती आयुक्तपदासाठी केवळ सहा महिन्यांचा काळ लाभेल. सर्वात ज्येष्ठ माहिती आयुक्तांकडेच हे पद देण्याची परंपरा कायम राखत सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.