शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबात राष्ट्रपती राजवट लागू करा

By admin | Updated: May 6, 2015 00:43 IST

पंजाबच्या मोगा येथे मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे मंगळवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले

नवी दिल्ली : पंजाबच्या मोगा येथे मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे मंगळवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी हे प्रकरण लावून धरत, पंजाबात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. लोकसभेत काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. मोगामध्ये विनयभंग केल्यानंतर मुलीला धावत्या बसमधून फेकून देण्यात आले. गत सोमवारी घडलेल्या या घटनेमध्ये पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या बसमध्ये हा प्रकार घडल्याने काँग्रेससह विरोधक या मुद्यावर आक्रमक झाले. राज्यसभेत संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हा राज्याचा मुद्दा असल्याचे सांगून तो संसदेत उपस्थित करण्यास विरोध दर्शवला; मात्र याउपरही काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला.  (लोकमत न्यूज नेटवर्क) > राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. एकापेक्षा एक गंभीर गुन्हे घडत आहेत व सरकार हातावर हात ठेवून गप्प बसले आहे. अशा स्थितीत पंजाब सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली.