शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

By admin | Updated: January 26, 2016 19:11 IST

राजकीय संकटाला सामोरा जात असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीला आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूरी दिली

 ऑनलाइम लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - राजकीय संकटाला सामोरा जात असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीला आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूरी दिली असल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. दरम्यान, काँग्रेसने काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात केंद्राच्या या शिफारशीला आव्हान दिलेले आहे. 

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. गतवर्षी १६ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात राजकीय संकट चालून आले. काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपाचे ११ आणि दोन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन एका अस्थायी ठिकाणी अधिवेशन भरवत, विधानसभाध्यक्ष नबाम रेबिया यांच्यावर ‘महाभियोग’ चालवला होता. अखेर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या आदेशावर सही केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

 दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काल (सोमवारी) मुखर्जी यांना भेटून मोदी सरकारचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस हा मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी यावेळी केला. राष्ट्रपतींना भेटणाऱ्यांमध्ये गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, कपिल सिब्बल, व्ही. नारायण सामी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर आझाद म्हणाले, काँग्रेस या मुद्यावर संसदेत व संसदेबाहेर आणि न्यायालयात लढा देईल. त्याचाच भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुणाचलमधील बंडखोर काँग्रेस उमेदवार आणि भाजपा नेत्यांमधील संभाषणाची टेप काँग्रेसने सोमवारी सार्वजनिक केली होती.