शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत दयेचा अर्ज करा; अन्यथा फास आवळला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 04:05 IST

तिघे तिहारमध्ये, एक मंडावलीत : ‘निर्भया’च्या खुन्यांना तुरुंगाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

नवी दिल्ली : ‘फाशी टाळण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपले असल्याने दयेचा अर्ज करणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यानुसार दयेचा अर्ज करायचा असल्यास येत्या सात दिवसांत करा. अन्यथा तुम्हाला फासावर लटकविण्याची पुढील कारवाई केली जाईल’, अशी नोटीस ‘निर्भया’च्या चार खुन्यांना तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ च्या ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चार खुन्यांना २९ आॅक्टोबर रोजी तिहारच्या अधीक्षकांनी ही नोटीस दिली. यापैकी तिघे तिहारमध्ये तर एक मंडावली कारागृहात आहे.

तिहारचे कारागृह महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, या नोटिशीनुसार या चौघांची इच्छा असल्यास त्यांनी येत्या सात दिवसांत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून तसे कळविणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास न्यायालयाकडून त्यांच्या फाशीचे वॉरन्ट घेण्यासाठी पुढील कारवाई केली जाईल.महिला आयोगाने विचारला होता जाबसर्वोच्च न्यायालयानेही फेरविचार अर्ज फेटाळून एक वर्ष उलटले असल्याने खुन्यांना लगेच फाशी दिले जावे यासाठी निर्भयाच्या आईने केलेल्या अर्जांवर न्यायालयाने व दिल्ली महिला आयोगाने अलीकडेच तुरुंग प्रशासनास जाब विचारला होता. या चौघांखेरीज फाशी झालेल्या रामसिंग नावाच्या आणखी एका खुन्याने आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन होता. बालगुन्हेगार म्हणून झालेली तीन वर्षांची शिक्षा भोगून तो चार वर्षांपूर्वीच सुटला आहे.