शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

माधुरी सादरेंचा वारस लावण्यासाठी अर्ज

By admin | Updated: November 5, 2015 23:29 IST

जळगाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज यांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला. न्या.आर.एस.भाकरे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. बोदवड येथे कार्यरत असताना सादरेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मॅट कोर्टाने हे निलंबन रद्द केले होते. जयकुमार यांनी निलंबनाबाबत बदनामी केली म्हणून सादरे यांनी त्यांच्याविरुध्द दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता या खटल्यात ८ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.

जळगाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज यांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला. न्या.आर.एस.भाकरे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. बोदवड येथे कार्यरत असताना सादरेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मॅट कोर्टाने हे निलंबन रद्द केले होते. जयकुमार यांनी निलंबनाबाबत बदनामी केली म्हणून सादरे यांनी त्यांच्याविरुध्द दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता या खटल्यात ८ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.
सागरच्या वकीलांनी मागितली युक्तीवादासाठी वेळ
सागर चौधरी याच्या फिर्यादीवरुन अशोक सादरे यांच्याविरुध्द खंडणी व धाक दाखविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही चौकशी न करता न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे चौकशी करुन हा गुन्हा रद्द करावा यासाठी ॲड.विजय दाणेज यांनी फौजदारी खटला दाखल केला आहे. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. गुरुवारी सागरचेे वकील बिपीन पाटील यांनी या खटल्यात युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. त्यानुसार न्यायालयाने या खटल्यातही ८ डिसेंबर ही तारीख ठेवली आहे. याच दिवशी सादरे यांच्यावतीने प्रतिनिधी हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आंदोलनाची परवानगी देण्यात टाळाटाळ
अशोक सादरे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनासाठी परवानगी मागायला गेलेल्या दीपक गुप्ता यांना जिल्हा पेठ पोलिसांनी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर हे त्यांना अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे घेवून गेले. तेथे झालेल्या चर्चेत गुप्ता यांना परवानगी देण्यात आली.