शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट अनुदान मिळण्यासाठीचे अर्ज वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय; ११४ अर्ज चौकशीसाठी पाठविले

By admin | Updated: May 7, 2014 19:20 IST

सोलापूर :

सोलापूर : गारपीट पीक नुकसानीची रक्कम मिळाली नसल्याचे अर्ज दररोजच येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले ११४ अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयाला वर्ग करण्यात आले. याशिवाय तहसील कार्यालयाकडे आलेले अर्ज तपासणीसाठी वर्ग करण्यात आले. २६ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान जिल्‘ात झालेल्या गारपीटमध्ये आमचेही नुकसान झाल्याचे अर्ज शेतकरी वैयक्तिक व एकत्रित करीत आहेत. हे अर्ज स्वीकारुन चौकशीसाठी पाठविले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० एप्रिलपर्यंत असे वैयक्तिक ११४ शेतकर्‍यांचे अर्ज आले होते. ते तहसील कार्यालयाला वर्ग करण्यात आले. याशिवाय तहसील कार्यालयालाही शेतकरी अर्ज देत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला १ मेपासून आलेले अर्जही त्या-त्या तहसील कार्यालयाला पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील १०, उत्तर सोलापूर तालुक्यातील १५, बार्शीचे १६, अक्कलकोटचे ८, पंढरपूरचे १६, मोहोळचे २३, मंगळवेढ्याचे ५, सांगोला ३, माढ्याचे १५ तर माळशिरसच्या ३ शेतकर्‍यांचे अर्ज तहसील कार्यालयाला पाठविले आहेत.चौकटतहसीलमध्ये एकच गर्दीउत्तर सोलापूर तहसील कार्यालयात उत्तर सोलापूर तालुका तसेच शहरातील पडझडीच्या मदतीसाठी नागरिक हेलपाटे मारत आहेत. माझे नाव आले नाही, मला रक्कम एवढीच मिळाली, यादीत नाव आहे परंतु बँकेत पैसे जमा नाहीत, मी दिलेल्या अर्जांची चौकशी कधी होणार?, हे व अन्य प्रश्न घेऊन लोक उत्तर तहसील कार्यालयात गर्दी करु लागले आहेत. एकच कर्मचारी लोकांना उत्तरे देत काम करीत आहे.--------पडझडीचे ११ लाख बँकांत जमागारपीटसोबत झालेला अवकाळी पाऊस व वादळाने घरांचीही पडझड झाली होती. पडझडीसाठी उत्तर तहसील कार्यालयाने २४ लाख ९१ हजार २०० रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी ११ लाख ६० हजार ६०० रुपये तहसील कार्यालयाला आले आहेत. ही रक्कम लाभार्थींच्या नावे बँकांना दिली आहे. याशिवाय गारपीट पीक नुकसान न मिळाल्याने मार्डी, बीबीदारफळ, कौठाळी, अकोलेकाटी, कारंबा, होनसळ, साखरेवाडी, राळेरास, नरोटेवाडी, गुळवंची, सेवालालनगर, हिरज, भोगाव, डोणगाव, बेलाटी, कवठे, रानमसले येथील अर्ज चौकशीसाठी दिले आहेत.