विजय मतेचा जामिनासाठी अर्ज
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांड
विजय मतेचा जामिनासाठी अर्ज
हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांडनागपूर : पिंटू शिर्के हत्याकांडातील प्रमुख आरोपी विजय मतेने शिक्षेस स्थगिती देऊन जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्जावर २० फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.या हत्याकांडात सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये मतेसह कमलेश निंबर्ते, राजू भद्रे, आयुब खान पठाण, किरण कैथे, दिनेश गायकी, उमेश डहाके व रितेश गावंडे यांचा तर, निर्दोष सुटलेल्या आरोपींमध्ये मंगेश शिवाजी चव्हाण, मयूर ऊर्फ बंटी शिवाजी चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार, राजेश दयाराम कडू, महेश दामोदर बांते, संदीप नीळकंठ सणस व मारोती ऊर्फ नव्वा संतोष वलके यांचा समावेश आहे. १९ जून २००२ रोजी रघुजी राजे भोसले यांच्या वंशजाच्या जमिनीच्या वादातून स्वप्नील ऊर्फ पिंटू दिलीपसिंग शिर्केची न्यायमंदिराच्या सहाव्या माळ्यावर हत्या करण्यात आली होती. आरोपीतर्फे ॲड. शिरीष कोतवाल व ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.