शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेवर सतर्क राहण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

By admin | Updated: May 21, 2017 01:06 IST

चीनकडून सीमेवर होणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध अत्यंत सतर्क राहा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस दल आणि हिमालयाई राज्यांच्या सरकारांना केले.

गंगटोक : चीनकडून सीमेवर होणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध अत्यंत सतर्क राहा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस दल आणि हिमालयाई राज्यांच्या सरकारांना केले. भारत-चीन सीमेवरील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक राजनाथसिंग यांनी शनिवारी घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. राजनाथसिंग म्हणाले की, सीमेबाबत मतभेद असल्यामुळे भूतकाळात चिनी लष्कराकडून सीमेवर अतिक्रमणाचे प्रकार होत होते. आता हे प्रकार कमी झाले आहेत. तथापि, अनेक वेळा दोन्ही देशांची सेना आमने-सामनेयेते. अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमार्फत अशा प्रसंगांवर तोडगा काढला जातो. भारत-चीन यांच्यात अलीकडे तणाव वाढला आहे. चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी रेशीम मार्ग प्रकल्पासाठी आयोजित केलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ परिषदेला उपस्थित राहण्यास भारताने नकार दिला. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीमुळे महिनाभरापूर्वी दोन्ही देशांत मुत्सद्देगिरीच्या पातळीवर संघर्ष उडाला होता. या पार्श्वभूमीवर राजनाथसिंग यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांची बैठकीला उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)निमलष्करी दलाच्या शहिदांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई...राजनाथसिंग यांनी सिक्कीममधील नथूला येथील भारत-चीन सीमेला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, तसेच भारत-तिबेट पोलीस दलातर्फे शेराथांग सीमेवर आयोजित करण्यात आलेल्या सैनिक संमेलनास हजेरी लावली. देशसेवेत मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल. निमलष्करी दलातील ३४ हजार कॉन्स्टेबलची पदे हेडकॉन्स्टेबल पदांत रूपांतरित करण्यात येतील. जवानांच्या त्यागाची भरपाई पैशांत होऊ शकत नाही. तथापि, शहिदांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागता कामा नये. त्यासाठी भरपाईची रक्कम वाढवून १ कोटी करण्यात येईल.