स्वच्छ भारत अभियानाचे नेतृत्व करण्याचे राज्यपालांना आवाहन
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नवी दिल्ली- स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपती भवनात गुरुवारी देशभरातील राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना या मोहिमेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आणि या अभियानाच्या यशस्वीतेसाठी त्याचे नेतृत्व करण्याचे आवाहनही करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानाचे नेतृत्व करण्याचे राज्यपालांना आवाहन
नवी दिल्ली- स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपती भवनात गुरुवारी देशभरातील राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना या मोहिमेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आणि या अभियानाच्या यशस्वीतेसाठी त्याचे नेतृत्व करण्याचे आवाहनही करण्यात आले. शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी या मोहिमेची उद्दिष्टे आणि इ.स. २०१९ पर्यंत देशाच्या सर्व शहरी भागात स्वच्छतेसाठी तयार करण्यात आलेला आराखडा सादर केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)