शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

अतिरेकी सोडल्याबद्दल मागितली माफी

By admin | Updated: June 5, 2014 00:31 IST

अमेरिकन सैनिकाची सुटका करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात पाच तालिबानी दहशतवादी सोडण्याचा निर्णय अध्यक्ष ओबामा यांनी सिनेट सदस्यांना अंधारात ठेवून घेतला.

वॉशिंग्टन : अमेरिकन सैनिकाची सुटका करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात पाच तालिबानी दहशतवादी सोडण्याचा निर्णय अध्यक्ष ओबामा यांनी सिनेट  सदस्यांना अंधारात ठेवून घेतला. त्यावर वाद निर्माण झाल्यामुळे व्हाईट हाऊसने माफीनामा प्रसिद्ध केला आहे. 
सिनेटच्या गुप्तचर समितीच्या अध्यक्षा व अध्यक्ष ओबामा यांच्या डेमोक्रॅट पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या डायना फेनिस्टिन यांच्या मते या व्यवहाराची पूर्वकल्पना काँग्रेसला न देऊन व्हाईट हाऊसने अमेरिकेतील कायद्याचा भंग केला आहे. सैनिकाची मुक्तता करण्यासाठी पाच तालिबानी दहशतवाद्यांची सुटका करताना कोणतीही सल्लामसलत करण्यात आली नाही, त्यामुळे काही सिनेट  सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत , तर काहीजणांची निराशा झाली आहे. हा निर्णय अमेरिकन कायद्याचा थेट भंग आहे. आम्ही फारच निराश झालो आहोत. 
फेनिस्टिन यांनी आपल्या वक्तव्यात दोन्ही सदस्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बर्गडहल या सैनिकाची मुक्तता करण्यासाठी पाच कट्टर दहशतवादी सोडणो योग्य आहे काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. 
हा वाद गुंडाळण्यासाठी व्हाईट हाऊसच्या ज्येष्ठ अधिका:यांनी सोमवारी रात्री गुप्तचर समितीतील ज्येष्ठ रिपब्लिकन सदस्य सॅक्सी चाम्ब्लीस यांना बोलावले व दहशतवाद्यांना सोडण्याच्या निर्णयाची पूर्वकल्पना न दिल्याबद्दल माफी मागितली. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टोनी ब्लिनकिन यांनी फेनस्टिन यांना भेटून या प्रकरणी माफी मागितली आहे.  (वृत्तसंस्था)