मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन
By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST
मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन
मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन
मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीनविशेष न्यायालय : जातीय अत्याचार प्रकरणनागपूर : जातीय अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने राणी दुर्गावतीनगर येथील पंचशील हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश सगणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. याच शाळेचे प्रयोगशाळा सहायक वेणुधर धापोडकर यांच्या तक्रारीवरून यशोधरा पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१४ रोजी या मुख्याध्यापकाविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम खबरी अहवालानुसार सगणे हे धापोडकर यांना जातीचे वैधता प्रमाणपत्र मागत होते. त्यासाठी वारंवार पत्र देत होते. पुढे त्यांनी धापोडकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सगणे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता. फिर्यादीने सूडभावनेतून खोटी तक्रार दाखल केली, असा बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. पराग बेझलवार, ॲड. मनोज भेंडे, ॲड. सी. एस. ठाकूर यांनी काम पाहिले.