नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी महाभारत फेम गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणारे हिंदूविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. हे आंदोलन म्हणजे एक सुनियोजित कट असल्याचाही संघटनेचा दावा आहे. संघाने या वादात उडी घेतल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या आॅर्गनायझरमध्ये केंद्र सरकारद्वारे एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर सुरू झालेले आंदोलन आणि बॉलीवूडमधील काही नामवंतांनी या आंदोलनाला दिलेला पाठिंबा यावर मत मांडणारा सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे. संदीप सिंग यांनी लिहिलेल्या या लेखात आंदोलनकर्त्यांवर जोरदार आगपाखड करण्यात आली आहे. या लेखात असे म्हटले आहे की, चौहान यांच्या नियुक्तीनंतर हिंदूविरोधी शक्ती एकवटल्या असून, परंतु विद्यार्थ्यांच्या आड कारवाया करणाऱ्यांना या आंदोलनातून काहीच साध्य होणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एफटीआयआयमधील आंदोलनकर्ते हिंदूविरोधी
By admin | Updated: July 19, 2015 02:37 IST