शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या आणखी एका दहशतवाद्यास अटक

By admin | Updated: February 6, 2016 03:49 IST

इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या आणखी एका दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

नबीन सिन्हा,  नवी दिल्लीइस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या आणखी एका दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीरसह ११ राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय अन्वेषण संस्था (एनआयए) आणि गुप्तचर संस्थेने (आयबी) दिलेल्या सूचनेच्या आधारे इब्राहिम सय्यद नामक तरुणाला काश्मिरी गेट आयएसबीटी येथे अटक करण्यात आली. सय्यद हा मुंबईच्या मालाड भागात राहणारा आहे. २२ जानेवारीला हरिद्वारमध्ये अटक करण्यात आलेल्या ४ जणांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी उत्तराखंडला जात होता. त्याच्याकडून ८५ हजार रुपये आणि आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले. इसिस आणि इंडियन मुजाहिदीनने भारतात संयुक्त गट स्थापन केला असून, अधिकाधिक तरुणांना आपल्याकडे ओढण्याचे या संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी यासिन भटकळच्या अटकेपासून इंडियन मुजाहिदीनचे देशातील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे इतर कारवायांसाठी मुजाहिदीनचे पाकिस्तानातील नेते आता इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ११ जणांना एनआयए कोठडीइसिसची भरती मोहीम राबविण्याच्या आरोपात अलीकडेच देशभरात अटक करण्यात आलेल्या ११ दहशतवाद्यांना स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी ७ दिवसांसाठी राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविले.या दहशतवाद्यांना जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी जाबजबाबादरम्यान सीरियात इसिससोबत जाऊ इच्छिणाऱ्यांची भरती आणि त्यांना आर्थिक मदत करण्याच्या कामात आपल्या सहभागाची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती काढून घेण्याकरिता आणखी १० दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती एनआयएने केली होती.